अमरावति (प्रतिनिधी) : अमरावति जिल्ह्यात येणार्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर सर्कलचे शिवसेना पदाधिकारी सतीश पारधी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या नऊ पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या यांच्या उपस्थितित काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अभिजित बोके यांचे विरोधात सतीश पारधी यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती.
मात्र आता त्यांच्या सह अतुल तिखे ,जितेंद्र बायस्कर, नितीन कळमकर, सुधीर काळे, मंगेश डहाके, मनोज घोरमाडे ,शामदास निमावत , गजानन पारधी, महादेव पाटील या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून व पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पक्ष मजबुतीकरणासाठी कामे करण्याचा संकल्प सतीश पारधी यांनी या वेळी व्यक्त केला.
यावेळी तिवसा पालकमंत्रि एड. यशोमति ठाकुर,तिवसा तालुका काँग्रेस पक्षाचे मुकुंद देशमुख, जितेंद्र ठाकूर, कामगार सेल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज देशमुख, तिवसा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गजानन अळसपुरे, सदस्य मिलिंद काळमेघ, रवींद्र हांडे, संदीप आमले, तिवसा तहसील युवक काँग्रेसचे अध्यक्ष लोकेश केने, कामगार सेलचे संजय चौधरी, अतुल गवड , पंचायत समिती सदस्य अ.सत्तार , आदि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.