तळवेल जवळ अपघातात एक ठार एक जखमी

0

वरणगाव | प्रतिनिधी 

भुसावळ तालुक्यातील  राष्ट्रीय महामार्गा वरील तळवेल फाटयावर सकाळी दहा वाजेच्या सुमारास महिद्रा बोलेरो गाडी व अ‍ॅपे रिक्षात जोरदार धडकेत रिक्षातील महिला जागीच ठार झाल्या तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

या बाबत वृत असे तालुक्यातील व राष्ट्रीय महामार्गावरील तळवेल गावाजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास  वरणगाव येथुन मुक्ताईनगर कडे जाणारी महिंद्रा बोलेरो क्र एम एच १९ बी जे ५७५८ या गाडीने मुक्ताईनगर कडून येणाऱ्या अॅपे रिक्षा क्र एम एच १९ सी डब्ल्यु  ०७४८ ला समोरून जोरदार धडक दिल्याने अॅपे रिक्षातील महिला राधाबाई कोंडीराम भालेराव ( ५५ ) रा चोपडा नाका यावल ह्या जागीच ठार झाल्या तर रिक्षा चालक मिलींद बळीराम मोरे हा गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे

या बाबत शैलेश शरद हिवरे यांच्या फिर्यादीनुसार महिंद्रा गाडी चालक प्रविण मदन सोनवणे यांच्या विरोधात वरणगाव पोलीसात भा द वि कलम २७९ , ३०४ ( अ ) ३३७ , ४२७ प्रमाणे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन घटनेचा पुढील तपास पो हे कॉ मुकेश जाधव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.