तळई येथे कमलाई मेडिकलतर्फे होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप

0

भातखंडे (प्रतिनिधी) :- येथून जवळच असलेल्या तळई येथे कोरोना विषाणूच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर तळई गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व तथा एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती तळईचे माजी सरपंच ओंकार धनाजी पाटील यांचा लहान मुलगा व महेंद्र पाटील,नरेंद्र पाटील यांचे भाऊ नितीन ओंकार पाटील(कमलाई मेडिकल) हल्ली फर्म कासोदा या ठिकाणी असुन त्यांनी आपल्या आईच्या अर्थात कै. कमलताई ओंकार पाटील यांच्या पुण्यस्मणार्थ गावात कोविड-१९ या महामारी मध्ये गावाची सेवा  घडावी या उद्देशाने  गावात प्रत्येक घरापर्यंत होमिओपॅथी गोळ्या पोहचवल्या त्याने गावातील ग्रामस्थांनमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. व गावातील लोकांनी नितीन ओंकार पाटील यांचे आभार देखील मानले व त्यांना भावी आयुष्यासाठी आशीर्वाद सुद्धा दिले.यावेळी दानशूर व्यक्तिमत्व नितीन ओंकार पाटील यांच्या मित्रपरिवारातील प्रकाश पाटील,रतन गायकवाड, ज्ञानेश्वर कंखरे, राहुल मराठे, दिगंबर पोतदार यांनी सर्व घरापर्यंत गोळ्या पोहचवल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.