तलाठी महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकास कठोर शिक्षा व्हावी !

0

जळगाव  |  रजनीकांत पाटील प्रतिनिधी 

दि ८ नंदुरबार जिल्ह्यात ५-६-२१ रोजी घडलेल्या घटना भाजपचे नगरसेवक श्री गौरव चौधरी यांनी शासकीय कर्मचारी (तलाठी) सौ निशा पावरा या आदिवासी महिलेला अमानुषपणे मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ करून विनयभंग केला असल्याने सदरची घटना  माणुसकीला काळीमा फासणारी  आहे भाजपची प्रवृत्तीची महिलांना छळण्याची असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत  जळगाव जिल्ह्यात समस्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या  वतीने या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी या प्रकरणात दिरंगाई झाल्यास निषेध मोर्चा काढण्यात येईल तरी सदर  महिलेस तात्काळ योग्य तो न्याय मिळावा या बांबत चे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांना देण्यात आले या वेळी जिल्हाध्यक्षा वंदन चौधरी, शकीला तडवी,मीनाक्षी चव्हाण, दीपिका भामरे, दिव्या भोसले  सलीम इनामदार महाजन सर इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.