रावेर :- पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काश्मीरचे ३७० कलम हटवून धाडसी निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे भविष्यात पाकव्याप्त काश्मीरवर देखील कब्जा भारत करु शकतो, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गुरूवारी येथे आयोजित सभेत केले. रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे व मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार रोहीणी खडसे – खेवलकर यांच्या प्रचारार्थ शहरातील छोरीया मार्केटमधील भव्य प्रांगणात गुरूवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे व यावल पं.स. सभापती पल्लवी चौधरी, जि.प. सदस्या नंदा पाटील, रंजना पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीराम पाटील उपस्थित होते.