कॉंग्रेसचे नेते शशी थरुर यांचा व्हिडिओ व्हायरल
मुंबई :- सुप्रसिद्ध लेखक आणि कॉंग्रेसचे नेते शशी थरुर यांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे. एमबीआयएफएल 19 या फेस्टिव्हलमध्ये व्याख्यान देण्यासाठी शशी थरुर आलेले असताना त्यांना एका विद्यार्थिनीने प्रश्न विचारला की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर काय घडले असते? त्यावर शशी थरुर यांनी हे उत्तर दिले आहे की व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचे राज्य असते, असे उत्तर दिले आहे.
हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरलही होतो आहे.
आपल्या भाषणात त्यांनी तंजावूरचे उदाहरणही दिले आहे. संभाजी महाराजांना सांभार खाण्याची इच्छा झाल्याने त्यांच्यासाठी ते खास तयार करण्यात आले. त्यानंतर हा पदार्थ दक्षिणेत आला. त्यामध्ये स्थानिक मसाले, चिंच यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सांबार ही मराठ्यांनी दिलेली देणगी आहे. संभाजी महाराजांना ते आवडत असल्याने त्याचे नाव सांभार असे पडले होते, असेही थरुर यांनी म्हटले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही महाराष्ट्रात त्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यानंतरही पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपल्याला इतिहासावरुन ठाऊक आहेच. त्याचमुळे जर इंग्रज भारतात आले नसते तर मराठ्यांनीच देशावर राज्य केले असते, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे. आपल्या साधारण तीन मिनिटांच्या उत्तरामध्ये थरुर यांनी देशात आपल्या वेगळं असण्याचा इंग्रजांनी कसा फायदा घेतला ते देखील सांगितले आहे. अहमद शाह अब्दाली याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव केला. हा पराभव मराठ्यांसाठी धक्कादायक म्हणावा असा पराभव होता. अहमद शाह अब्दालीला भारतावर राज्य करायचे नव्हते. तो आला त्याने लढाई केली, या ठिकाणी असेला खजिना लुटला, मौल्यवान हिरे, जवाहिर लुटून नेले आणि तो अफगाणिस्तानला परतला. मात्र समजा हा पराभव झाला नसता आणि देशात इंग्रज आलेच नसते तर या देशावर म्हणजेच भारताव मराठ्यांनी राज्य केले असते, असे शशी थरुर यांनी म्हटले आहे.