…तर फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई । करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. तेव्हा दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच असंही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  या दरम्यान फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही उत्सव साजरा करता येणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्रात अनेक जत्रा, उत्सवांचं आयोजन रद्द करण्यात आलं. तसंच सर्वांनी ते करावं, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. दिल्लीवरुन मरकजमधून आलेले १०० टक्के लोक सापडले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.