जळगाव : पाकिस्ताननं सीमेवरील कुरापती न थांबवल्यास भारताकडून पाकिस्तानवर तिसरा सर्जिकल स्ट्राइक केला जाऊ शकतो, अशी माहिती माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी दुपारी जळगावात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना डा. भामरे यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवाव्यात म्हणून भारताने सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. पण आपण चांगला शेजारी निवडू शकत नाही. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानच्या कुरापतींना भारताने वेळोवेळी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी पाकिस्तानवर दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान सुधारला नाही तर भारत लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करेल, असे डॉ. भामरेंनी यावेळी सांगितले.