…तर जळगाव दुध संघाला यापेक्षाही चांगले दिवस येतील- आ.खडसे

0

जळगाव | जळगाव जिल्हा दुध उत्पादक संघाची ४८ वी सर्वसाधारण सभा आज पार पडली. दरम्यान, यावेळी माजी महसूल मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी महिलांसाठी स्वतंत्र डेअरी असावी असे मत व्यक्त केले आहे. तसेच जळगाव दुध संघाने आपले कार्यक्षेत्र वाढविल्यास यापेक्षा जास्त चांगले दिवस दुध संघास येतील, असेही ते म्हणाले. याप्रसंगी दुध संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, आ. सुरेश भोळे, आ. किशोर पाटील, दुध संघाचे संचालक मंडळ उपस्थित होते.

संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी सांगितले की, सन २०१८-१९ मध्ये दूध संघाने भौतिक व आर्थिक अशा दोन्ही क्षेत्रातील कामगीरी चांगली झाली आहे. आज मागील ४६ वर्षातील दैनिक दुध संकलनाचा उच्चांक गाठून ३ लाख २७ हजार लिटर्सच्या वर प्रतिदिन संकलन केले आहे. दुध संघाने ४९४ कोटी रकमेची वार्षिक उलाढाल घडवून नवीन उच्चांक प्रस्तापित केला आहे. २०१८-१९ मध्ये ३ कोटी ११ लाखांचा नफा झाला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या डेअरी मंडळाचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.