वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली असून यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत करोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली होती.
व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध कायमच चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे अमेरिकेने केलेल्या औषधाच्या ऑर्डरवरील बंदी भारत उठवणार नाही, यासाठी असं होणार नाही. मला कल्पना आहे की भारताने हे औषध इतर देशांमध्ये निर्यात करण्यावर बंदी घातली आहे. मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली होती. आमच्यात चांगला संवाद झाला. भारताचे अमेरिकेसोबत संबंध कायमच चांगले राहिले आहेत.”असे ते ट्रम्प म्हणाले. पण जर भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे.
करोनाने अमेरिकेत थैमान घातलेलं असून तीन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला करोनाचा खूप मोठा फटका बसला आहे.