.. तर अनेक पक्षांचे बडे नेते भाजपमध्ये असते- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई – विरोधकांना घाबरविण्यासाठी भाजपाकडून सरकारी यंत्रणेचा वापर करण्यात येतो, अनेकांच्या मागे चौकशी लावली जाते असं आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. जर सरकारी यंत्रणाचा वापर केला असता, तर अनेक पक्षांचे बडे नेते आज भाजपमध्ये असते असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी माझा’ला या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मनसे आता उनसे म्हणजे उमेदवार नसलेली सेना झाली आहे तर महाराष्ट्रात जातीयवाद पसरवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

दरम्यान , भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी आपणहून चौकशीची मागणी करत राजीमाना दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेच्या दबावामुळे किरीट सोमय्यांचे तिकीट कापल नाही, दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला माझ्या पक्षातील निर्णय मी घेईल, असे शिवसेनेतून विरोध पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते, असाही दावा फडणवीसांनी केला. गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे देशात भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल, अशी खात्रीही मुख्यमंत्री फडणवीसांना वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.