तरूणीशी शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला अटक

0

जळगाव । तरूणीशी बळजबरी प्रेमसंबंध ठेवून शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. धिरज दिलीप चिरमाडे (वय-२३,रा. विठ्ठल पेठ, विठ्ठल मंदीर शेजारी जुने जळगाव) असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

धिरज चिरमाडे हा गेल्या काही महिन्यापासून शहरातील २० वर्षीय तरुणीचा पाठलाग करीत होता. दरम्यान १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीच्या घरी जावून धमकावत, ‘माझ्याशी प्रेमसंबंध ठेव, लग्न कर, शरीर संबध ठेव, असे केले नाही तर तूझे फोटो फेसबुकवर टाकून तुझ्या परीवाराची बदनामी करेल’ अशी धमकी देवून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. दरम्यान हा प्रकार असह्य झाल्याने पिडीत तरूणीने एमआयडीसी पोलीस गाठले. तरूणीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात संशयित आरोपी धिरज चिरमाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी धिरज चिरमाडे याला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल वाठोरे, सचिन मुंडे, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद यांनी अटक केली. संशयित आरोपीला आज न्यायालयात हजर करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.