तरूणीने विष घेवून केली आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

यावल ; तालुक्यातील दहीगाव येथील २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावलपोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या घटने विषयी माहिती अशी की, तालुक्यातील दहीगाव येथील सुरेश आबा नगर यावल रस्त्यावर राहणाऱ्या उच्च शिक्षीत तरूणी सुजाता संतोष पाटील २० वर्ष हिने रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेपुर्वी आपल्या राहत्या घरात तिने काही तरी  विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

याबाबत मयत तरूणीचे काका काशीनाथ एकनाथ पाटील (वय-४८) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  यावल च्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ . बी बी बारेला यांनी मयताचे शवविच्छेदन केले.  पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here