Friday, September 30, 2022

तरूणाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

- Advertisement -

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

- Advertisement -

चाळीसगाव  शहरातील २२ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या आत्महत्येमागचे  नेमके कारण अद्याप समजू शकले नाहीय. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

चाळीसगाव शहरातील जय बाबाजी चौक येथील महेश विजयसिंह राजपूत (वय २२) या तरूणाने आपल्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

दरम्यान महेश याच्या मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वार्डातील नगरसेवक प्रदिप सत्यवान राजपूत यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा महेश याचा मृतदेह दोरीने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला.

चाळीसगाव शहर  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. नगरसेवक प्रदिप राजपूत यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या