तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील विजय माणिक महाजन (वय ३०) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील गेंदालाल मिल परिसरात विजय महाजन हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास असून शहरातील एका कंपनीत नोकरीस असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. कौटुंबिक कारणावरुन विजय महाजन यांनी गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शेजाऱ्यांंच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती त्याच्या कुटुंबियांना दिली.

त्यानंतर तात्काळ कुटुंबियांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने विजय याला खाली उतरवित जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मयत घोषीत केले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here