धानोरा (विलास सोनवणे) : कोण म्हणते प्रामाणिकपणा आजच्या जगात शिल्लक नाही. त्यातील उत्तम उदाहरण धानोरा येथिल तरुण शिक्षक पत्रकार प्रशांत सोनवणे यांना येथिल सेंट्रल बँकेत जास्तीचे मिळालेले ५० हजार क्षणाचा विलंब न करता त्यांनी लागलिच परत केले.त्यांच्या या प्रामाणिकपणाचे परीसरात कौतुक होत आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल पत्रकार व श्री समर्थ रघुनाथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक प्रशांत सोनवणे यांचे गावातच ग्राहक सेवा केंद्र आहे.त्या निमित्ताने बँकेत नेहमीच ये जा असते.दि १७ रोजी दुपारी १ वाजता बँकेत दोन वेगवेगळ्या खात्यावरील रक्कम काढली असता.त्यात ५० हजार रुपये जास्तीचे आले असे लक्षात आले.त्यांनी बँकेतल्या बँकेत जास्तीचे मिळालेले पैसे परत करुन दिले.यावेळी नविन आलेले शियर हे बोलले की,माझा दोन महीन्याचा पगार वाचला,नाहीतर हे पैसै मलाच भरावे लागले असते.
त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुक शाखाधिकारी संदिप यादव,माजी उपसभाफती माणिकचंद महाजन,सरपंच सुनिता कोळी,उपसरपंच विजय चौधरी,सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी एस महाजन,प्राचार्य के एन जमादार,पिकासो चेअरमन पन्नालाल पाटील,विकासो चेअरमन अनिल महाजन,पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी,विलास सोनवणे,वासुदेव महाजन,सुरेश महाजन,प्रशांत चौधरी,नाना सोनवणे,राजेंद्र बोदडे,श्री समर्थ वासुदेवबाबा ग्राहक सेवा केंद्राच्या योगेश्वरी सोनवणे,विलास सोनवणे,शुभम महाजन,अविनाश सोनवणे,सुनिल मेडीकल,चंद्रकिरण मेडीकल तसेच परीसरातुन कौतुक केले जात आहे.
प्रामाणिकपणा आमच्या अंगात
लोकांची भांडी घासुन नोकरीला लागलो आहे.श्रमाचे मोल आम्ही पिढी घडविण्यासाठी वापरतो.ते स्वतः अंगिकारले आहे.म्हणून लागलीच पैसै परत केले.
– प्रशांत सोनवणे