सरपंच व सरपंच पुत्रासह २६ जणांविरोधात गुन्हा, १८ संशयितांना अटक व कोठडी
पाडळसरे :- ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनलला मतदान केले नाही म्हणून व बहिष्कृत केल्याचा गुन्हा दाखल केला म्हणून राग अनावर झाल्याने एका कुटुंबातील चार व्यक्ती व एका महिलेला घरात घुसून जबर मारहाण जखमी केल्याची घटना येथून जवळच असलेल्या तरवाडे येथे घडली. मागील मार्च महिन्यात येथील ग्रामपंचायत निवडणुक पार पडली होती.
याप्रकरणी तरवाडे येथील सरपंच व रामकृष्ण अभिमन पाटील व पुत्र धीरज रामकृष्ण पाटील यांच्या सह २६ आरोपींविरोधात ७ रोजी रात्री उशिरा १ वाजता दंगलीचा गुन्ह्यासह विविध प्रकारच्या १० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. त्यातील १८ आरोपींना मारवड पोलिसांनी अटक करून अमळनेर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती वाय.जे. वळवी यांनी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे, या बाबत गावात शांतता असून पुढील ७ आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
६ रोजी रात्री ७ वाजता विनोद सुखदेव पवार हे आपल्या घरात टीव्ही पहात बसले असतांना गावातील सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील व पुत्र धिरज रामकृष्ण पाटील हे आपल्या २६ साथीदारांना घेऊन हातात लाठ्या, काठ्या, टॉमी ,दगड घेऊन माझे घरात घुसून मला अश्लील शिवीगाळ करत ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनलला मतदान केले नाही व आमच्या विरोधात जातपंचायत करून बहिष्कृत केले म्हणून गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आमच्या विरोधात फिर्याद दिली म्हणून मारहाण केली. अशी फिर्याद विनोद सुखदेव पवार राहणार तरवाडे याने दिल्यावरून २६ व्यक्ती विरोधात मारवड पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्ह्यासह विविध१० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील १८ आरोपींना कालच पोलिसांनी अटक केली. त्यांची पोलीस कोठडीत रवानगी झाली अाहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील हे करीत असून उर्वरित ७ आरोपी अल्पवयीन असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी सांगितले.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
१) सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील, २) सरपंच पुत्र धिरज रामकृष्ण पाटील, ३) समाधान नाना पाटील, ४) कौतिक तोताराम पाटील, ५) नाना शिवराम पाटील, ६) किशोर नाना पाटील, ७) नंदलाल कौतिक पाटील,८) नामदेव कौतिक पाटील,९) शिवाजी अशोक पाटील,१०) श्रीराम महिफत पाटील, ११) अशोक श्रीराम पाटील,१२) मनोहर श्रीराम पाटील,१३) छोटु बापु पाटील, १५) गुणवंत मनोहर पाटील, १६) राजेंद्र विठठ्ल पाटील, १७) रामकृष्ण आसाराम पाटील, १८) योगेश संजय पाटील, १९) बापु मोतिराम पाटील, २०) शरद ओंकार पाटील, २१) हिम्मत अभिमन पाटील, २२) पृथ्वीराज गोपीचंद पाटील इ. वर मारवड पोलिस स्टेशन मध्ये दंगल सह विविध १० कलमान्वये गुन्हा दाखल झाले आहे.