तळेगांव – शेळगांव प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याने भारावले. तळेगाव प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील तळेगाव येथील विद्यार्थ्यांनी ३४ वर्षानंतर पुन्हा शाळा भरवून एकत्र केले जुनी मित्र तसेच जुन्या आठवणींना उजाळा देत सामाजिक कार्यात देखील सहभाग नोंदवण्याच्या केल्या भावना व्यक्त यावेळी १९८७ -८८ या शैक्षणिक वर्षात सातवीला असणाऱ्या माजी विद्यार्थी यांनी तळेगाव येथे स्नेहसंमेलन आयोजित करून स्नेहभोजन तसेच मराठी शाळेला भेट दिली.
यावेळी मनीषा वारके प्रार्थना बागरेचा सोनाली ब्रम्हेचा शांताराम जाधव दिवाकर कुलकर्णी डॉक्टर गजानन पाटील आकोश कोळी रवींद्र पाटील ज्ञानेश्वर जाधव रवींद्र माळी मिलिंद लोखंडे संतोष गिरी विष्णू जाधव संदीप बागडे च्या जगन गोरे अशोक गोरेआदी माजी विद्यार्थी हजर होते यावेळी प्रास्ताविक शांताराम जाधव यांनी केले.
तर आकोश कोळी यांनी सदर संकल्पनेबाबत माहिती दिली तसेच या स्नेहसंमेलन ना सोबत सामाजिक बांधिलकी आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून आपण काहीतरी नवीन पायंडा पाडून शाळेसाठी किंवा काही गावातील इतर बाबीसाठी सर्व माजी विद्यार्थी मिळून योगदान देण्याचे ठरले तसेच सदर कार्यक्रम हा प्रत्येक वर्षी घेण्यात यावा व सर्वांनी सहकुटुंब हजर रहावे अशी देखील आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली