तत्कालिन नगराध्यक्षांनी शिक्षकांना लाख देण्याचे आदेश

0

बेकायदेशीर तीन शिक्षकांच्या भरतीप्रकरणी

जळगाव दि. 2-
तत्कालिन नगरपालिकेने बेकायदेशिरपणे तीन शिक्षकांची भरती होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सदर शिक्षकांची नियुक्ती रद्द करुन तत्कालिन नगराध्यक्षाकडून 3 लाख वसुलीचे आदेश दिले आहे. त्यानुसार मनपाने तत्कालिन नगराध्यक्षांना 3 लाख रुपये भरण्याचे पत्राद्वारे सूचना केल्याचे मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी मंगळवारी सांगितले.
तत्कालिन नगरपालिकेने 1997 मध्ये तीन शिक्षकांच्या नियुक्तीचा ठराव केला होता. वंदना चिंतामण यांच्यासह तीन शिक्षकांना शिक्षण मंडळात नियुक्ती देण्यासाठी 1997 मध्ये स्थायी समितीने ठराव मंजूर केला होता. त्या ठरावाच्या अनुषंगाने शिक्षकांना नियुक्ती देखील देण्यात आली होती. परंतु ही नियुक्ती चुकीच्या पद्धतीने असल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी 2010 मध्ये वंदना चौधरींसह तिन शिक्षकांनी औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली होती. ही नियुक्ती असल्याने औरंगाबाद खंडपीठाने तो ठराव रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच तत्कालिन नगराध्यक्षा तथा स्थायी समिती सभापती सुधा काळे यांच्याकडून 3 लाख रुपये वसुल करण्यात यावे व हे तीन लाख रुपये त्या तीन शिक्षकांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे देण्यात यावे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. सदर रक्कम ही लवकरात द्यावी, असे पत्र मनपाने सुधा काळे यांना दिले आहे. दरम्यान, काळे यांनी वेळेत ही रक्कम न दिल्यास मनपाने सदर तीन्ही शिक्षकांना प्रत्येकी एक लाख रुपये द्यावे व नंतर ते काळे यांच्याकडून वसुल करावे, असेही निकालात नमुद करण्यात आले असल्याची माहिती आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.