Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    • भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!
    • पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»तक्रारींची दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न
    जळगाव

    तक्रारींची दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 2, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पारोळा तालुक्यातील मुंदाने गावात तंटामुक्त गाव बक्षिस निधीत भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. या भ्रष्टाचारात सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावा मागणीसाठी मुंदाणे येथील सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत सोनवणे यांनी तक्रारी दिल्यात. पंरतू त्यांच्या तक्रारींची कोणतीही दखल न घेतल्यामुळे त्यानी आज शनिवार २ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

    सामाजित कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पारोळा तालुक्यातील मुंदाने ग्रामपंचायतीला शासनातर्फे तंटामुक्त अभियानांतर्गत गावाला दोन लाखाचे बक्षीस सन २०११-१२ मध्ये जिल्हाधिकारी यांच्याहस्ते देण्यात आले होते. मुंदाने ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच अलकाबाई दगडू पाटील, ग्रामसेवक राजेंद्र हिरामण पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांनी संगनमताने शासनाकडून मिळालेले २ लाख रूपयांचा निधी नियमानुसार कुठल्याच कामावर खर्च न करता फक्त कागदोपत्री बनावट दस्तावेज तयार करून निधी हडप केला आहे.

    याबाबत चंद्रकात सोनवणे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत निधी खर्च केल्याची माहिती मागविली होती. त्यात सरपंच आणि ग्रामसेवक यांनी दोन लाख रूपये परस्पर काढून घेतले असून गावात कुठलेच काम केलेले नाही. याबाबत एरंडोल गटविकास अधिकारी यांच्याकडे २०१६ मध्ये चौकशी करून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे. हा प्रस्ताव गेल्या ४ वर्षांपासून विस्ताराधिकारी गोकुळ लक्ष्मण बोरसे, राजेंद्र धोंडू इंगळे, गणेश प्रभाकर पाटील  व गटविकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांची पाठराखन करत फाईल दडपून ठेवली आहे.

    याप्रकरणी सरपंच, ग्रामसेवक, विस्ताराधिकारी व गटविकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतू त्यांच्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे यांनी महात्मा गांधी जयंती दिनी आज २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी वेळीच दखल घेतल्याने हा अनर्थ टळला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif