तंंदूर रोटी बनवताना हॉटेलमधील कामगाराचा गलिच्छपणा; व्हिडिओ व्हायरल

0

नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये तंदूर रोटी तयार करणारा माणूस रोटीवर चक्क थुकंतोय. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये चांद हॉटेलमध्ये दोघे भट्टीवर तंदूर रोटी बनवत आहेत. मात्र, यावेळी यातील एकजण तंदूर रोटी तयार करुन झाल्यानंतर तिला भट्टीमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर थुकंतोय. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाराची गंभीरपणे दखल घेत हॉटेलमधील दोन्ही आरोपींना तब्यात घेतले.


सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद इब्राहिम आणि साबी अनवर अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी IPC च्या 269, 270, 273 कलमांतर्गत या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, प्राथमिक तपासादरम्यान बऱ्याच धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला त्या हॉटेलकडे अधिकृत परवाना मिळाला नसल्याचे समोर आले आहे. परवाना नसल्यामुळे हॉटेल मालकावरसुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तंदूरी रोटीवर थुंकण्याचा हा प्रकार समोर आल्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.