मुंबई : सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणात आता अनेक बड्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या कलाकारांचं या प्रकरणी नाव आल्यानंतर बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचंही नाव आता तपासादरम्यान समोर आलं आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान एनसीबीला एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यात सुशांतसिंग राजपूतच्या टॅलेंट मॅनेजर जया शहा यांच्या कथित चॅटमध्ये ”डी” आणि ”के”चा उल्लेख आहे. दोघी ड्रग्स संदर्भात बोलत असल्याची माहिती हाती आली आहे. ‘डी’ म्हणजे दीपिका पादुकोण आणि ‘के’ म्हणजे करिश्मा ही नावं समोर आली आहेत. या प्रकरणी चौकशीसाठी लवकरच दीपिकाला समन्स बजावले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जया शाह यांना एनसीबीने आज मंगळवारी चौकशीसाठी बोलावले आहे. यावेळी अनेक महत्त्वपूर्ण खुलासे होऊ शकतात.
मीडियानुसार, ड्रग्जबाबत २८ ऑक्टोबर २०१७ च्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये दीपिका पदुकाेणचे नाव आले आहे. यात ‘डी’ हा काेडवर्ड दीपिकासाठी असल्याचे सांगितले जाते.
वाचा चॅट
‘डी’ ते ‘के’: तुमच्याकडे माल आहे का?
‘के’ उत्तरः आहे पण घरी आहे. मी वांद्रेमध्ये आहे.
के’ लिहितात: तुम्हाला हवे असल्यास मी अमितला सांगतो.
‘डी’ लिहितो: होय. कृपया
‘के’ लिहितात: अमितकडे आहे, तो ठेवतो.
‘डी’ लिहितात: “हॅश” हवे
‘डी’ लिहितो: “वीड’ नव्हे.
‘के’ लिहितात: आपण कोको ला कधी येणार आहात?
‘डी’ लिहितात: 11 ते 12 वाजे दरम्यान
सारासह या अभिनेत्रींना समन पाठवले जाईल
अन्वेषण यंत्रणेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, एनसीबी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि फॅशन डिझायनर सायमन खंबाटा यांना ड्रग्ज संबंधित प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात चौकशीसाठी बोलावणार आहे.