डोंबिवली येथे चितोडे वाणी समाजाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन

0

डोंबिवली : चितोडे वाणी समाज मुंबई परिसराचे वार्षिक स्नेहसंमेलन( वधू वर परिचय मेळावा) चे आयोजन डोंबिवली येथे दि १२ जानेवारी २०२० ला करण्यात आले आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश केशव स्वारुळ हे आहेत. तर उपाध्यक्ष श्रीकांत अशोक गडे, उपाध्यक्ष वैजयंती दिलीप सराफ, सचिव दिलीप मुरलीधर यावलकर, उपसचिव पंकज रमेश गजेश्वर, खजिनदार उल्हास वासुदेव वाणी हे राहणार आहे. दीप प्रज्वलन व स्नेहसंमेलनाचे उदघाटन गणेश वंदन यांच्या हस्ते होणार आहे. समीर नारद यांचे यशाचे शास्त्र ह्या विषयावर प्राणदायी भाषण होणार आहे. तसेच उमेश गडे (पुणे) यांचा शंखनाद कार्यक्रम होणार आहे.

दरम्यान, ज्यांना यात नावे द्यायची असेल त्यांनी दि ५ जानेवारी २०२०पर्यंत दिलीप यावलकर (9004575757), श्रीकांत गडे (9821226717) व पंकज गजेश्वर (9820962640) यांच्याकडे द्यावी. तसेच फॉर्म कार्यक्रमाच्या दिवशी स्वीकारण्यात येणार आहे. सॉफ्ट कॉपी व्हाट्सअप वर पाठवावी लागणार असून किती जण येणार आहे ते पण कळवायचे आहे. तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थितीत राहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here