डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग !

0

मुंबई : डोंबिवली एमआयडीसी फेस २ मधील मेट्रो पोलिटीन या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत आहेत.

या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.  शिवाय परिसरातील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.