डोंगर कोठारा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, गुन्हा दाखल

0

यावल । तालुक्यातील डोंगर कोठारा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. दरम्यान याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर असे की, येथील बारावीच्या वर्गात शिकणारी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणी यावल येथे शिकत होती. दरम्यान  (दि. १९ जुन) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास यावल येथे शाळेची एसटी प्रवास काढण्यास गेली असतांना ती उशीर झाला तरी घरी न परतल्याने ती कुढे गेली असावी, तिला कोणी पळवून तर नाही ना..? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे अल्पवयीन तरुणीचे काकांनी आज (दि. 21 जुन) रोजी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवण्यात आली आहे. तरुणीस पळविणा-या व्यक्तीविरुध्द लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.