जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील डोंगर कठोरा येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातुून बांधण्यात येत असलेल्या महीला शौचालयाचे काम ठेकेदाराकडुन अत्यंत निकृष्ठ प्रतिचे करण्यात येत असुन या कामाची चौकशी करून संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रारी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी जळगावयांच्याकडे करण्यात आली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की डोंगर कठोरा तालुका यावल येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन शासनाच्या लाखो रुपयांच्या निधीतुन अनुसूचित जमातीच्या आदीवासी बाधवांच्या वस्तीत शौचालयाचे बांधकाम करण्यात येत असुन , या कामाच्या ठेकेदाराकडुन शासकीय निवीदाप्रमाणे नमुद करण्यात आलेल्या तांत्रीक बाबींचा विचार करण्यात आल्याचे दिसुन येत असल्याने या शौचालयाचे काम हे निकृष्ठ प्रतिचे होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी सदरच्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून बांधकाम ठेकेदारास देयके रक्कम अदा करावीत शासन नियमास धाब्यावर ठेवुन शौचालयाची बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराचे नांव काळया यादीत टाकावे अशी मागणी ग्रामस्थ आणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.