मुंबई :- मुंबईच्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली ४० ते ५० जण अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या इमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Maharashtra CM Devendra Fadnavis on Dongri building collapse: As per the initial information I have received, around 15 families are feared trapped in the collapse. The building is around 100 yrs old. The entire focus is on rescuing the people trapped. Investigation will be done. pic.twitter.com/ApIVqmNLMb
— ANI (@ANI) July 16, 2019
ही इमारत १०० वर्षे जुनी आहे. या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केलेला होता. मात्र, म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सगळी योग्य माहिती घेऊन त्यानंतर मदतीसंदर्भातली घोषणा केली जाईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.