यात्रेनिमित्त डफ वाजविल्या कारणावरून भगतास मारहाण : नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

यावल :- तालुक्यातील डोंगरकठोरा येथील सालाबादप्रमाणे होळीच्या दुसर्‍या दिवशी भरणाऱ्या यात्रेनिमित्त खंडेराव महाराज यांच्या नावाने बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. त्यासाठी एक दिवस आधी म्हणजे दि. 20 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भक्ताने गावात डफ वाजवून सूचना देण्याचे काम सुरू केले असता डफ वाजविण्याचा त्रास होत आहे, असे एकाने सांगितले याचा राग आल्याने नऊ जणांनी व अन्य दहा ते बारा अनोळखी व्यक्तींनी लोखंडी रॉड, लाठ्या, काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नरेंद्र भास्कर पाटील यांनी यावल पोस्टेला फिर्याद दिली की, भगताने डफ वाजविला त्याचा त्रास माझ्या लहान नातवास होत आहे, असे बोलण्याचा राग लीलाधर दयाराम जंगले, मयूर लीलाधर जंगले, सुनंदाबाई लीलाधर जंगले, स्वाती मयुर जंगले, गिरीश राजेश पाटील, आकाश उर्फ मामा निळकंठ लोखंडे, नितीन बाबुराव धांडे, पवन आनंदा आले, अभिषेक शर्मा व त्यांच्यासोबत दहा ते पंधरा इतर जणांनी घराचा दरवाजा मोडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच मला व माझ्या आई, पत्नी, काका यांना शिवीगाळ दमदाटी करून गिरीश पाटील यांनी आईच्या उजव्या हाताच्या मनगटावर रॉड मारून दुखापत केली. तर इतर सर्वांनी आम्हाला सर्वांना काठ्यांनी लोखंडी रॉडने व् चापटा बुक्क्यांनी मारहाण करून दमदाटी शिवीगाळ केली. तसेच घरातील दरवाजे, लाईट, नळाचे पाईप, सौचालयाचा दरवाजा इत्यादी वस्तूची तोडफोड करून अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान केले. या कारणावरून नऊ जणांसह इतर दहा ते पंधरा जणांविरुद्ध यावल पोस्टेला भाग-5 गु.र.नं. 33/ 2019 भा.द .वी. 324 ,452, 143, 147, 148 ,149, 323, 427, 04, 506 कलम 37 (1 ) ( 3 ) 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करून यावल न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संशयित आरोपी एका महिलेस लहान बाळ असल्याने न्यायालयाने सहानुभूती पूर्वक विचार करून त्या महिला आरोपीचा जामीन मंजूर केला.

डोंगर कोठारा गावात यात्रेनिमित्त सूचना देताना भगताने डफ वाजविली चे कारणावरून एकाच समाजात वाद निर्माण झाला मारहाण करण्यासाठी भुसावळ येथील काही खास व्यक्ती त्याच रात्री डोंगर कठोरा गावात तात्काळ हजर झाल्याने दंगल झाली यामुळे गावात एकच खळबळ उडाली. पुढील तपास यावल पोलिस करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.