डोंगरकठोरा जि.प.उर्दु शाळेच्या आवारात घाणीचे उकीरडे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका

0

यावल : तालुक्यातीत डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेतील आवारात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन यामुळे विद्यार्थी आणी शिक्षक यांच्यासह परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

डोंगरकठोरा ता. यावल येथील जिल्हा परिषद ऊर्दू शाळेच्या कंपाऊंडच्या परिसरातील संरक्षण भिंत नसल्याने चारही बाजुने मोकळया असलेल्या आवारातील आतील ठीकाणी गावातील काही बेजबाबदार नागरीकांनी मागील सुमारे पाच ते सहा वर्षापासुन गुराढोरांसह शेणखताचे उकिरडे टाकुन ठेवले आहे. त्यातुन निर्माण होणारी दुर्गंधी शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकेदायक आहे. सद्या शाळा बंद असुन येथे उकिरडे टाकणाऱ्यांना मोकळीक मिळाली आहे. तेव्हा या कडे ग्राम पंचायत  प्रशासनासह ग्रामस्तरीय स्वच्छता अभियान समितीने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.