गृहराज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांचे हस्ते थाटामाटात स्टिकरचे अनावरण
चाळीसगाव –
चाळीसगाव रोटरी मिलेनियमतर्फे आज अकोला येथे रोटरीच्या अनाथ मुलांसंदर्भातील स्नेह – बंधन कार्यक्रमात गोवर रूबेला लसीकरण जनजागृती संदर्भातील स्टिकरचे अनावरण अकोला जिल्हा पालकमंत्री तथा नगरविकास , सामान्य प्रशासन व गृहराज्यमंत्री मा.ना.रणजितजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
*यावेळी मिलेनियम अध्यक्ष तथा तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांचा 40 हजार विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्यात गोवर रूबेला लसीकरण जनजागृती केलेबद्दल मा.मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांचे स्विय सहाय्यक ( जडऊ ) मा.श्रीकांतजी भारती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.*
प्रसंगी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष मा.ना.प्रविणजी घुगे यांनीही गोवर रूबेला जनजागृती स्टिकरचे व डॉ सोनवणे आणि स्टिकर प्रकाशनास सहकार्य केलेबद्दल चाळीसगाव नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ रंजनाताई यशवंतराव सोनवणे यांचेदेखील कौतुक केले.
यावेळी अंजनगावचे प.पू जितेंद्रनाथ महाराज व्यासपीठावर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली येथील महामंञी मा.मिलिंदजी परांडे, आमदार रामकिशन बजोरिया, आमदार गोवर्धनजी शर्मा , रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या प्रथम महिला रोटे रश्मीजी , अकोला रोटरीचे रोटे विजय जानी , रोटे ब्रिजमोहन जी , अॅड.रोटे.देवाशिष काकड आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या या कार्यक्रमास केंद्रीय मंञी ना.मेनका गांधी, राज्याच्या ग्रामविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे हे उपस्थित राहणार होते माञ काही कारणास्तव दोघेही येऊ शकले नाहीत.
रोटरी मिलेनियमतर्फे सामाजिक भावनेतून जनजागृतीसाठी सुमारे 45 हजार रूपये खर्चून व जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी मा डॉ बी एस कमलापुरकर मॅडम, जिल्हा परिषद सदस्य मा अतुलदादा देशमुख, प स सदस्य मा.अजय पाटील, मा.सौ प्रिती विष्णू चकोर व तालुका आरोग्य अधिकारी मा.डॉ देवराम लांडे, संस्थापक मिलेनियम अध्यक्ष रोटे प्रितेश कटारिया, सेक्रेटरी रोटे केतन बुंदेलखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जनजागृती उच्चांक 40 हजार गाठला आहे.
माञ लवकरच 50 हजारापर्यंत जनजागृतीचा उच्चांक नेऊन आरोग्य विभागाचा लौकिक वाढविणार असल्याची बोलकी प्रतिक्रिया डॉ प्रमोद सोनवणे यांनी व्यक्त केली.