जळगाव- येथील जिल्हा ब्राम्हण महासंघाच्या वतीने १५फेब्रुवारी शनिवार रोजी सायंकाळी ५वाजेला नागपूरचे सुपरिचित वक्ते डॉ सुमंत टेकाडे यांचे रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे या विषयावरती व्याख्यान आयोजित केलेले आहे,
डॉ सुमंत टेकाडे यांनी बेंगलोर येथून एमबीएम ईन ह्युमॅन रिसोर्स मॅनेजमेंट हि पदवी प्रात्प केली आहे, विप्रो टेक्नॉलॉजीज बंगलोर येथे ते मॅनेजर म्हणून कार्यरत होते,या कार्यकाळात त्यांनी एक हजारावर मुलाखती घेत विप्रोच्या भरती क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे, सामाजिक कार्यप्रती आपली जबाबदारी ओळखूंन त्यांनी २०वर्ष पूर्णवेळ म्हुणुन कार्य केले असून हा कार्यक्रम कांताई सभागृह नवीन बस स्थानक जवळ जिल्हा पेठ येथे होणार आहेत, तरी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी सर्वांसाठी खुला आहे असे आवाहन जिल्हा ब्राम्हण महासंघातर्फे केले आहे.
