Thursday, September 29, 2022

डॉ. सागर गरुड यांच्या वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा ; ११५ रक्तदात्यांनी केले रक्तदान

- Advertisement -

शेंदुर्णी, ता.जामनेर (प्रतिनिधी) : शेंदुर्णीचे सुपुत्र व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ सागर दादा गरुड यांच्या वाढदिवसा निमित्त आज जामनेर तालुक्यात विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीर, जामनेर तालुक्यातील सरकारी रुग्णालयात फळे, सँनिटायझर,मास्क व धान्याचे कीट वाटप करुन करोनाचे नियम पाळत डॉ. सागरदादा गरुड मित्र मंडळाच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

- Advertisement -

रक्तदान शिबीर

- Advertisement -

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज शेंदुर्णीच्या माहेश्वरी मंगल कार्यालयात रेड प्लस रक्तपेढी व विघ्नहर्ता स्टोरेज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे  आयोजन करण्यात आले होते.या शिबीराचे उद्घाटन पहुरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सागरदादा गरुड सहा.पोलिस  निरिक्षक किरण बर्गे तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी, नगरसेवक व डॉ. सागर दादा गरुड मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या शिबिरात ११५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. सागरदादा गरुड यांचा सत्कार करण्यात येऊन शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

अन्नधान्याचे कीट,सँनिटायझर चे वाटप वाढदिवसाच्या निमित्ताने आज डॉ. सागरदादा गरुड यांनी जामनेर तालुक्यातील काही गावात १५० गरजुंना अन्नधान्याचे कीटचे वाटप तसेच २०००मास्क व २००० सँनिटायझर बाटल्या जामनेर उपजिल्हा रुग्णालयात ,तसेच पळासखेडा येथील कोवीड सेंटर मधील रुग्णांना फळे,सँनिटायझर, मासकचे वाटप करण्यात     आले.यासाठी डॉ. सागरदादा मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

आ.रोहित दादा पवार व अनेकांनी दिल्या शुभेच्छा

आज डॉ. सागरदादा गरुड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आ.रोहित दादा पवार यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्यात सोबतच जामनेर व पाचोरा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच असंख्य रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच डॉ. सागरदादा गरुड यांच्या चाहत्यांनी  शुभेच्छा दिल्या आहेत.

नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी ; डॉ. सागरदादा गरुड

आज आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील असंख्य नेते, पदाधिकारी ,चाहते यांनी शुभेच्छा दिल्यात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत डॉ. सागरदादा गरुड यांनी नागरिकांना आवाहन केले की,करोनाला घाबरून जाऊ नका,आपण शासनाने दिलेले नियमांचे पालन करावे, मास्कचा,सँनिटायझर चा वापर करावा आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतुन विघ्नहर्ता हाँस्पिटलमध्ये आपण डॉ. भुषण दादा मगर यांच्या सहकार्याने रुग्णांना सदैव रुग्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगुन सर्वांचे आभार मानले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या