डॉ. सागर गरुड यांचा सेवा गौरव पुरस्कार देवुन सन्मान

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाँस्पिटलचे संचालक डॉ. सागर गरुड (शेंदुर्णीकर )यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव व सर्व सामान्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची वृत्ती याची दखल घेत औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने, माणुसकी समुहाच्या कडुन सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

डॉ. सागर गरुड यांनी करोनाच्या काळात रुग्णालयात असंख्य रुग्णांना बरे केले आहे. यासोबतच धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रात आपले योगदान दिले असुन परिसरात आपल्या हक्काचे व्यक्ती म्हणुन जनमानसात अल्पावधीतच चांगली प्रतिमा तयार केली आहे.याचीच दखल घेत त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात सहा.पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह ,प्रमाणपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन औरंगाबाद च्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर,आर्थिक गुन्हे शाखेचे पो.नि.डी.एस.शिनगारे, पो.नि.संतोष खेतमाळस,व्याख्याते डॉ. दिनेश गुप्ता व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पंडीत यांनी केले.

आपल्याला हा पुरस्कार मिळाला यामुळे सेवा करण्याची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे सत्काराला उत्तर देताना डॉ. सागर गरुड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.