भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या कोळगाव ता.भडगाव येथील कला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक (प्रभारी प्राचार्य) व कापडणे (ता.जि. धुळे) येथील रहिवासी संतोष पंडित माळी सर यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या विद्यापीठातून मानवविद्या शाखेतून मराठी विषयात संशोधक मार्गदर्शक प्रा.डॉ. वासुदेव सोमाजी वले उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख एस.एस.एम.एम.कला, विज्ञान व वाणिज्य वरीष्ठ महाविद्यालय पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली शांता शेळके यांच्या गद्य साहित्याचा चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन पीएच.डी पदवी संपादन केली.मौखिक परीक्षा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संपन्न झाली .सदर विवा साठी रेफरी म्हणून डॉ. कैलास अंबुरे सर मराठी विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद हे होते तर अध्यक्ष म्हणून डॉ. आशुतोष पाटील सर मराठी विभागप्रमुख कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे होते.
डॉ. संतोष माळी सर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील , संस्थेचे संचालक प्रशांत पाटील, डॉ.पुनमताई प्रशांत पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच संस्थेचे सर्व संचालक, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर आणि मित्रपरिवार, नातेवाईक यांनी अभिनंदन केले.