डॉ. रितेश पाटील यांना भारतरत्न डॉ. राधाकृष्ण गोल्ड मेडल अवॉर्ड

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण – चिंचोल येथील रहिवासी डॉ. रितेश लक्ष्मण पाटील यांनी शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्लोबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अॅण्ड रिसर्च असोसिएशन दिल्ली यांच्यातर्फे भारतरत्न डॉ. राधाकृष्ण गोल्ड मेडल अवॉर्ड प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार सोहळा नुकताच बंगलोर येथे पार पडला. डॉ. पाटील हे एमएससी कृषी पीएच.डी. आहेत. त्यांनी धुळे येथील कृषी महाविद्यालयातून बीएससी तर राहूरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एमएससी पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी याच विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी संपादन केली. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा राष्ट्रीय पात्रता परीक्षा यूजीसी नेट उत्तीर्ण केली आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये नऊ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहे. शिक्षण व संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नुकताच त्यांना भारतरत्न डॉ. राधाकृष्ण गोल्ड मेडल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे आ. चंद्रकांत पाटील, अॅड. रविंद्रभैय्या पाटील, राहूरी येथील कृषी विस्तार प्रमुख व संशोधन मार्गदर्शक डॉ. मिलिंद अहिरे, श्रीराम पाटील, संतोष पाटील, गोपाल पाटील, विकास पाटील, सचिन पाटील, किशोर पाटील, गंभीर पाटील, प्रभाकर पाटील, डॉ. जगदीश पाटील आदींनी कौतुक केले आहे. डॉ. रितेश पाटील हे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील श्री. एस. बी. चौधरी हायस्कूलचे पर्यवेक्षक एल. डी. पाटील यांचे सुपुत्र आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.