डॉ बाबासाहेब स्वीकारणे म्हणजे आचरण करणे गरजेचे – प्रा.केदार

0

जळगाव :– बाबासाहेबानी केलेला संघर्ष एका जातीपुरता मर्यादित न राहता सर्व व्याप्त आहे. स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी हिंदू कोड बिल मांडले ते स्वीकारले गेले नाही म्हणून राजीनामा दिला. संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित करताना ज्ञान शिक्षणाकरिता पुढे राहिले. शिक्षणाने मनुष्य गुर्गुरतो त्याला स्वत्वाची जाणीव होते त्यामुळे त्यांना स्वीकारताना त्यांना आचरणात आणा असे केसीई संचालित शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय आयोजित १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाच्या अनुशंगाने केसीई सोसयटीचे जनसंपर्क अधिकारी प्रा.संदीप केदार यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.ए.आर.राणे,प्रा.निलेश जोशी,दुष्यंत भाटेवाल उपस्थित होते. कार्यक्रमच्या सुरवातीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रा.निलेश जोशी यांनी बाबासाहेबाच्या शिक्षणविषयक विचारांवर शाळेत असताना अभ्यासलेल्या पुस्तकातील आठवण सांगितली तर प्रा. दुष्यंत भाटेवाल यांनी बाबासाहेबांच्या कार्याची माहिती दिली.ग्रंथपाल एम.एम. वनकर यांनी डॉ बाबासाहेब यांची जयंती ज्ञानदिवस म्हणून पाळला जात आहे तसेच सध्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा हक्क प्रत्येकाने पार पाडावा कारण श्रीमंत असो व गरीब प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे तेव्हा तो आपला अधिकार जरूर पाळावा असे आवाहन केले.

कार्यकर्माचे अध्यक्ष डॉ.राणे यांनी बाबासाहेब त्यांचे विचार व शिक्षणविषयक दृष्टीकोण यावर मार्गदर्शन केले .कार्यकर्माचे प्रास्ताविक प्रा. डॉ.के.व्ही बाविस्कर व आभार डॉ.एस.ए.नेमाडे यांनी केले . यावेळी प्रा.आर.सी.शिंगाणे ,डॉ.आर आर सोनवणे,डॉ.एस.डी.भंगाळे,डॉ.व्ही.एस .चौधरी,डॉ एस.व्ही.चव्हाण,प्रा.के.पी.चौधरी आदी उपस्थित होते.कार्यकर्माच्या यशस्वितेकरिता मोहन चौधरी,विजय चव्हाण यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.