जळगाव । प्रतिनिधी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येथील झालटे ग्रुप चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते योगेश अहिरे, दैनिक लोकशाही चे व्यवस्थापक सुभाष गोळेसर,चंद्रकांत पंधारे म न पा कर अधिकारी, ऍड दिपकराज खडके,अश्विनी गोळेसर,कैलास पंधारे,चेतन अहिरे, सिद्धार्थ गवाई आदींनी गरजू व निराधार व्यक्तींना चहा, नाश्ता, फळे देऊन इत्यादींचे नियमांचे पालन करीत वाटप केले .
तसेच अहोरात्र सेवा करणारे पोलिस मित्रांचेही त्यांनी करीत असलेल्या कामाबद्दल आभार मानीत त्यांनाही सकाळी चहा,नाश्ता इत्यादींचे वाटप केले व त्यांचे मनापासून कौतुकही केले.
योगेश अहिरे व झालटे ग्रुप सदस्य व कार्यकर्ते हे दिनांक 01 जानेवारी पासून नियमित कार्य करीत आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या सर्वांनी डॉ बाबासाहेब यांना त्रिवार वंदन केले.
