भुसावळ | प्रतिनिधी
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळ या संघटनेतर्फे डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्त मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे व कंपनी यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक रंगारंग भिमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .स्थानिक रेल्वे ग्राउंड येथे दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित या कार्यक्रमाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे .