जळगाव :- भारतीय जनता पार्टी, शिवसेना,आर.पी.आय(ए), रासप, शिवसंग्राम, महायुतीचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार आ.उन्मेषदादा पाटील यांनी दि.१४ एप्रिल रोजी सर्वप्रथम भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन जवळील पूर्णाकृती पुतळ्याला सकाळी ८.०० वा. लोकसभेचे अधिकृत उमेदवार आ.उन्मेषदादा पाटील व आ.राजूमामा भोळे यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
यानंतर प्रभाग क्र.१६ येथील पंचमुखी हनुमान मंदिरापासून प्रचार रॅलीला सुरुवात केली. सदर प्रचार रॅली पंचमुखी हनुमान मंदिरापासून गणेश वाडी’, जानकीनगर, मंजुषा कॉलनी, संत गाडगेबाबा चौक, ईश्वर कॉलनी, लाठी शाळा, साईबाबा मंदिर, लक्ष्मी नगर, सम्राट कॉलनी, टी.एम.नगर, समधा नगर, जोशी कॉलनी, मुकुंद नगर, ढाके वाडी, चोखामेळा, जाखनी नगर, जोशी कॉलनी, चेतनदास हॉस्पीटल गल्ली, नेत्रज्योती हॉस्पीटल गल्ली, झुलेलाल गल्ली, नाथवाडा, ते सेवामंडल येथे समारोप करण्यात आला.
प्रसंगी भाजपचे जिल्हामहानगर अध्यक्ष आ.राजूमामा भोळे, ना.डॉ.गुरुमुख जगवानी, आ.चंदूभाई पटेल, महापौर सिमाताई भोळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, आर.पी.आय.(ए)चे अनिल अडकमोल, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मंडल अध्यक्ष सुशील हासवाणी, महिला बाल कल्याण सभापती मंगला चौधरी, गटनेते भगत बालानी, बंडूदादा काळे, आबा कापसे, कैलास सोनवणे तसेच प्रभाग क्र.१६ चे नगरसेवक गटनेते भगत बालानी, रजनी अत्तरदे, मनोज आहुजा, रेश्मा काळे, सुचिता हाडा, सरिता नेरकर, विरेन खडके, अण्णा भापसे, सुनील खडके, प्रशांत नाईक, कुंदन काळे, चेतन शिरसाळे, व मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते अनिल जोशी, संजय लुल्ला, विक्की सोनार, राजेश मलिक, अरुण चांगरे, रेश्मा खडके, विवेक सोनवणे, दिलीप नेतलेकर, प्रकाश बालानी, शरद बाविस्कर, सुनील जोशी, अनंत जोशी, संदीप मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सदर प्रचार रॅलीचे भव्य स्वागत ढोल तासे, आतिषबाजीत स्वागत विवेक जगताप, महेश पाटील, अनिल जोशी, संजय लुल्ला, विक्की सोनार, राजेश मलिक, अरुण चांगरे, रेश्मा खडके, विनू लखवाणी, राजू अडवाणी, चेतन शिरसाळे, राजू शर्मा, गोलू जोशी, ललित कानडे, दिलीप शिंपी, सेवा मंडल, गटनेते भगत बालानी, योगेश बागडे, वासुदेव जोशी मंडळ, कंजरभाट समाज, भैरवनाथ समाज यांनी भव्य स्वागत केले.
दुपारी १.०० वैद्यकीय आघाडी व हॉकर्स युनियनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महायुतीचे जळगाव लोकसभेचे अधिकृत उमेदवार आ.उन्मेषदादा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला.