डॉ.जे.जी.पंडीत माध्यमिक विद्यालयात र्डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0

लोहारा :- येथील डॉ. जे.जी. पंडित माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जे.आर.भालेराव सर यांनी भूषवले. विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एम.सुर्वे सर यांनी केले. तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत सादर केले. यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.निकम सर तसेत विद्यालयाचे शिक्षक पी. यू.खरे सर व्ही.बी.इंगळे सर यांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजीक, शैक्षणिक, राजकीय कार्याविषयी माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.आर.भालेराव सर यांनी बाबासाहेबांच्या सामाजीक कार्य व सुधारणा याची माहीती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व्ही.एम.शिरपुरे सर यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.