मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवचरण उज्जैनकर यांनी कोरोना लोकडाऊन काळामध्ये राबवलेल्या विशेष उपक्रमांबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील तथा तालुकाध्यक्ष आत्मारामभाऊ जाधव यांनी उज्जैनकर सर यांना गौरव पत्र देऊन नुकतेच सन्मानीत केले प्रसंगी राजूभाऊ शर्मा उपस्थित होते.
उज्जैनकर यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये नगरपंचायत व पोलिस अशा २५ कर्मचाऱ्यांना मुक्ताईनगर येथील चौफुलीवर चहा, पाणी, नाष्ट्याची व्यवस्था केली तसेच जे डॉक्टर्स, नर्सेस, पत्रकार, समाजसेवक, शिक्षक, कलाकार कोरोना काळात विशेष सहकार्य करत आहेत महाराष्ट्रातील अशा १२६८ मान्यवरांना कोरोना योद्धा गौरव प्रमाणपत्राणे उज्जैनकर यांनी ऑनलाइन गौरविलेले आहे आणि त्यांच्या शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन व ए. व्हि. जी. फिल्म्स अंड प्रोडक्शनच्या सहकार्याने २१ मे ते १ नोव्हेंबर २०२० पर्यंत फेसबुक लाईव्ह महाव्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रासह, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि नेदरलँड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया यातील १५५ नामवंत मराठी भाषिक व्याख्यात्यांनी विविध विषयावर व्याख्याने देऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवला त्यांच्या व्याख्यानांचा उपयोग उज्जैनकर यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजासाठी पुरेपूर केला तसेच ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त महाराष्ट्रातील ज्या शिक्षकांनी कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबवले आहेत अशा उपक्रमशील ४१ शिक्षकांना आदर्श शिक्षक ई पुरस्काराने उज्जैनकर यांनी गौरवलेले आहे अशा हरहुन्नरी उपक्रमशील उज्जैनकर सरांचा अनेक मान्यवरांनी आतापर्यंत गौरव केलेला आहे.
उज्जैनकर यांनी कोरोना लॉकडाऊन काळामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व कला क्षेत्रातील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील यांनी उज्जैनकर यांचा गौरवपत्र देऊन नुकताच सन्मानित केला.