जळगाव, दि.9 –
जिल्ह्यातील माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवानी यांची महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली असून त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. डॉ.जगवानी यांच्या वाढदिवशीच शासनाने भेट देत शासननिर्णय जारी केला आहे.
जळगाव जिल्हा विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ.गुरूमुख जगवानी यांची महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने डॉ.जगवानी यांच्या वाढदिवशी दि.9 रोजी शासननिर्णय जारी करीत डॉ.गुरूमुख जगवानी यांना महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष म्हणून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच डॉ.जगवानी यांची नियुक्ती या समितीची पुनर्रचना होईपर्यंत कायम राहिल असे शासनाने स्पष्ट केले आहे.
वाढदिवशी मिळालेल्या या भेटीमुळे डॉ.गुरूमुख जगवानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन, माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे, पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार मानले आहे. डॉ.जगवानी यांना राज्यमंत्रीचा दर्जा देत सिंधी समाजाचा शासनाने सन्मान केला असून त्याबद्दल संपूर्ण सिंधी समाजाने भारतीय जनता पक्षाचे आभार मानले आहे.