Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील उपचाराने सुजित विसपुतेंचे वाचले प्राण
    ताज्या बातम्या

    डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयातील उपचाराने सुजित विसपुतेंचे वाचले प्राण

    Tushar BhambareBy Tushar BhambareNovember 24, 2020No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तब्बल दोन महिन्यानंतर मिळाला डिस्चार्ज

    जळगाव – डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात अंत्यंत गंभीर अवस्थेत कोरोनाबाधित रुग्ण २ सप्टेंबर रोजी उपचारार्थ दाखल झाला होता. कोरॅड स्कोअर हा खराब असल्याने त्यांना तब्बल २५ दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. डॉ.पाटील रुग्णालयातील तज्ञांनी केलेले उपचार आणि रुग्णाने दिलेल्या प्रतिसादामुळे मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी रुग्णाला तब्बल दोन महिन्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. याप्रसंगी रुग्णासह कुटूंबियांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले असून रुग्णालयाने दिलेल्या अहोरात्र सेवेबद्दल त्यांनी आभार मानले.

     

    जळगाव शहरातील पिंप्राळा येथील रहिवासी सुजित विसपुते (वय ४८) ह्यांना गणपतीच्या दिवसांमध्ये अचानक त्रास जाणवायला लागला, उपचारासाठी ते जळगावातील काही खासगी दवाखान्यात दाखल झाले मात्र बरे न वाटल्याने त्यांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. २ सप्टेंबर २०२० रोजी रुग्ण सुजित विसपुते यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण असल्याने तात्काळ कोरोना टेस्ट याशिवाय सीटी स्कॅन करण्यात आला, रिपोर्टनुसार ४० पैकी ३२ इतका सीटी सेव्हरिटी स्कोर आला. कोरॅड स्कोर अधिक असल्याने रुग्णाच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञांच्या टिमने त्यांच्यावर केलेल्या उपचारामुळे विसपुते यांची प्रकृती सुधारण्यात यश आले.

     

    सदर रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्यांना कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील ह्दयरोग तज्ञ डॉ.वैभव पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.पाराजी बाचेवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफ यांनी उपचार केले.

     

    आयसीयुमध्ये २५ दिवस दिला लढा

    रुग्ण सुजीत यांची प्रकृती अतिशय खराब असल्याने त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल २५ दिवस आयसीयुमध्ये ते होते. डॉक्टरांचे उपचार आणि आयुष्याची दोरी मजबूत असल्याने तब्बल पंचवीस दिवस सुजीत यांनी जीवनमरणाशी लढा दिला. त्यांच्या प्रकृतीतील सुधारणा बघता त्यांना नॉर्मल वॉर्डात दाखल करण्यात आले, त्यावेळीही त्यांना तब्बल ३० दिवस ऑक्सीजन लावण्यात आला. अखेरीस दहा दिवस त्यांचा ऑक्सीजनचे प्रमाण कमी करण्यात आले. दोन महिने सातत्याने उपचार घेतल्यावर प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून इन्फेक्शन देखील दूर झाल्याचे निष्पन्न झाल्यावर रुग्णालय प्रशासनाने सुजीत विसपतु यांना डिस्चार्ज दिला.

     

    रुग्णालयाने दिले जीवनदान – मयूर विसपुते

    गणपती उठल्याच्या दुसर्‍या दिवशी वडिलांची प्रकृती गंभीर झाली होती, उपचाराकरीता आम्ही रुग्णालयात आलो, वडिलांच्या गंभीर प्रकृतीची दखल घेत तात्काळ उपचारासाठी दाखल करुन घेण्यात आले. वडिलांना पंचवीस दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले त्यानंतर कोविड रुग्णालयात ठेवले, येथील डॉक्टरांसह प्रशिक्षीत नर्सिंग स्टाफने वेळोवेळी आवश्यक ते उपचार केले, अर्ध्यारात्री सुद्धा त्रास होतोय सांगितल्यावर सर्व धावून यायचे, वडिलांसोबत मी कायम रुग्णालयातच राहिलो, आज त्यांची प्रकृती पूर्णत: बरी झाली असून डॉक्टरांनी सुट्टी मंजूर केली, आज खुप छान वाटत आहे रुग्णालयाने माझ्या वडिलांना जीवनदान दिले. आज घरी जात असल्याने कुटूंबिय देखील आतुरतेने वाट पाहत असल्याचे रुग्ण सुजीत विसपुते यांचा मुलगा मयूर विसपुते याने सांगितले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026

     फरार आरोपी विनोद तराडचा जिल्हा बँकेसाठी उमेदवारी अर्ज!

    November 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif