डॉक्टर देवदूतच असतात-नगरसेवक प्रताप शिंपी

0

अमळनेर | प्रतिनिधी

शहरातील डॉ संदीप जोशी ह्यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये प्रभाग क्र 15 मधील त्रिमूर्ती नगर (गोहिल नगर) शिवसेना शाखा प्रमुख गोटू मराठे हा महिन्याभरापासून ऑक्सिजन वर ऍडमिट होता. महिनाभर ऑक्सिजन म्हणजे लाखोंचे बिल होणार परंतु प्रभागाचे कार्यतत्पर नगरसेवक,माजी शिवसेना शहरप्रमुख प्रताप शिंपी यांनी सुरुवातीलाच डॉ संदीप जोशी यांना सदर व्यक्ती गरीब आहे व आम्हीं सर्व त्यास सहकार्य करीत आहोत याची कल्पना दिली होती . गोटू मराठे हा सुरुवातीला डॉ विक्रांत पाटील यांच्याकडे ऍडमिट होता मात्र ऑक्सिजन ची त्यास गरज असल्याने डॉ नी त्यास त्यांचे कडे उपलब्धता नसल्याने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले तेथे 15 दिवस राहून तो अमळनेर येथे आला मात्र डॉ जरी देवदूत असले तरी ऑक्सिजन च्या रुग्णास खाजगी हॉस्पिटल मध्ये किती दिवस ठेवणार अखेर आज त्यास अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले व तेथे त्याची व्यवस्था डॉ जोशी यांनीच ऑक्सिजन बेड वर करून दिली व ते स्वतः तेथे व्हिजिटिंगला जाऊन त्यांवर लक्ष देणार आहेत.महिन्याभराचे बिल  त्यांनी सर्व सहकारी व नगरसेवक प्रताप शिंपी देत असल्याने डॉ देखिल भावुक झालेत व त्यांनी अतिशय माफक बिल घेतले,त्याबद्दल सर्व प्रभाग क्र 15 च्या त्रिमूर्ती नगर सहकारी,शिवसैनिक व नगरसेवक प्रताप शिंपी,उपशहरप्रमुख जिवन पवार आदींनी डॉक्टरांचे आभार मानून डॉ देवदूतच असतात असे उदगार काढलेत. गोटू मराठे याच्या पत्नीचे नुकतेच कोरोनात निधन झाले असून गोटू लवकर सुखरूप परत येवो अशी प्रार्थना सर्वच व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.