Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»डेंग्यूने घेतला पहिला बळी!
    ताज्या बातम्या

    डेंग्यूने घेतला पहिला बळी!

    By September 6, 2018No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शिवाजीनगरातील चार वर्षीय बालिकेचा मृत्यू : मनपा प्रशासनाला आली जाग

    जळगाव, दि.6 –
    शहरातील शिवाजीनगरमधील संभाजी चौक परिसरातील प्रभात मेडीकल चौकातील रहिवाशी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा डेंग्यूच्या आजाराने खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुदैवी घटना आज सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची तात्काळ दखल घेवून मनपा प्रशासनाकडून परिसरात लागलीच अबेटींग, फवारणी व धुरळी उपाययोजना करण्यात आली.
    शहरातील शिवाजीनगर परिसरातील रहिवाशी असलेले प्रशांत दशरथ पाटील यांची चार वर्षाची चिमुकली जान्हवी प्रशांत पाटील हिला दोन दिवसांपासून थंडी, ताप येत असल्याने तिच्यावर प्राथमिक उपचार सुरु होते. काल दि.5 रोजी तिची प्रकृती खराब झाल्याने तिला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान चिमुकलीचे वडील उज्ज्वल ऑटोमोबाईल इन्शुरन्स कंपनीत तर काका न्यायालयात लिपीक असल्याचे समजते.
    आ.भोळे, कैलास सोनवणेंची भेट
    घटनेची माहीती मिळताच डेंग्यू निर्मुलनाची मोहीम राबविणारे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी शिवाजी नगरात जावून पाटील कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील भाजप नगरसेवक नवनाथ दारकुंडे, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर हे देखिल उपस्थित होते. यावेळी सोनवणे यांनी तात्काळ या ठिकाणी महापालिका मलेरिया विभागाचे सुनिल पांडे, सुधीर सोनवाल यांच्यासह पथकाला बोलावून घेतले. यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी देखील पाटील कुटुंबियांची भेट घेवून महापालिका अधिकार्‍यांना उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
    परिसरात तात्काळ धुरळणी
    घटनेनंतर माजी  नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दखल घेत सायंकाळी संपूर्ण शिवाजीनगर परिसरात धुरळणी केली. प्रत्येक गल्लीत स्वःता फिरून संस्थेच्या स्वयंसेवकांकडून त्यांनी फवारणी करून घेतली. तसेच परिसरातील नागरिकांशी चर्चा केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif