डी.वाय.एस.पी. कैलास गावडे यांच्या हस्ते कोरोना काळात उकृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा कारोना योद्धा म्हणून सन्मान

0

भडगाव  ((प्रतिनिधी) : भडगाव पोलिस स्टेशनची 2020-21 या वर्षाची वार्षिक तपासणी चाळीसगाव विभागाचे डी.वाय.एस.पी. कैलास गावडे यांनी केली. या वेळी कारोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस पाटील, विशेष पोलिस अधिकारी (माजी सैनिक), होमगार्ड, यांचा कारोना योद्धा प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला. तसेच कारोना काळात पिंपरखेड येथील पोलिस पाटील स्व. विलास माणिक पाटील यांचे निधन झाले होते.

यावेळी त्यांच्या पत्नी यांचा विशेष सत्कार करत.  मरणोत्तर कारोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी चाळीसगाव विभागाचे डी.वाय.एस.पी. कैलास गावडे, भडगाव तहसिलदार- सागर ढवळे, पोलिस निरीक्षक- अशोक उतेकर, पोलिस उपनिरीक्षक- आनंद पटारे, पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, सर्व पोलिस कर्मचारी, तालुक्यातील पोलिस पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.