जळगाव दि.21 :-
जिल्हा परिषद जळगाव कार्यालयांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात देखभाल दुरूस्ती कक्षासाठी डिटीपी ऑपरेटर पद भरण्याकामी जाहिरात 21 फेबु्रवारी रोजी प्रसिध्द झाली असून जाहिरातीत नमुद केलेल्या अर्हता धारण केलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अ.क्र.1 नुसार डाटा एंट्री ऑपरेटर पद-1 साठी किमान अर्हता कोणत्याही शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किमान 50 टक्के गुणांसह(गणित किंंवा सांख्यिकी विषय घेवून पदवी उत्तीर्ण असणार्यास प्राधान्य, 2) एम.एस.सी.आय.टी. प्रमाणधारक(विंडोज व इंटरनेटचे ज्ञान असणे आवश्यक) 3) स्वयंसेवी संस्था अथवा शासकीय विभागामधील डाटा एंट्री ऑपरेटर पदाचा 2 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य 4) मराठी व इंग्रजी टायपिंग (मराठी 30 शब्द प्रति मिनीट व इंग्रजी 40 श. प्र. मि.) असल्यास प्राधान्य
दरमहा रक्कम 8000/-रु.मात्र मानधन देण्यात येणार असून शासकीय कार्यालयात काम करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे.
सदर पदाकरिता अर्ज करावयाची मुदत दि. 22/02/2019 ते 28/02/2019 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत असून इच्छूक उमेदवारांनी विहीत अर्ज व कागदपत्रे, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि.प. जळगांव येथे सादर करावीत. असे जाहीरातीत नमूद करण्यात आले आहे.
सदर पदाची सविस्तर जाहिरात सर्व साधारण अटी/शर्ती व विहीत अर्जाचा नमुना जिल्हा परिषद जळगाव कार्यालयाच्या www.zpjalgaon.gov.in या संकेतस्थळावर पदभरती व जाहिरात या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद जळगाव या कार्यालयात उपलब्ध आहे.तरी डिटीपी ऑपरेटरची नोकरी करू इच्छीणार्या इच्छुक गरजवंतांनी 28 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद जळगाव मार्फत कळविण्यात आले आहे.