डिझेलच्या किंमतीत कपात; पाहा आजचा दर

0

नवी दिल्ली: डिझेलच्या किंमतीत गुरुवारी कपात करण्यात आली, तर पेट्रोलची किंमत सलग दुसर्‍या दिवशी स्थिर राहिली. दिल्ली आणि कोलकाता येथे डिझेल 16 पैसे प्रतिलिटर स्वस्त झाला आहे, तर मुंबईत डिझेलच्या किंमतीत 17 पैशांनी आणि चेन्नईमध्ये 15 पैसे प्रतिलिटर कपात झाली आहे. तेल कंपन्यांनी देशातील अन्य शहरांमध्येही डिझेलचे दर कमी केले आहेत. गेल्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत दोन टक्क्यांहून कमी झाल्यानंतर बेंचमार्क क्रूड ऑइल ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 45 डॉलर खाली आला आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील डिझेलची किंमत गुरुवारी अनुक्रमे. 73.40 रुपये, 76.90 रुपये, 79.94 रुपये और 78.71 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर पेट्रोलची किंमत अनुक्रमे  82.08 रुपये, 83.57 रुपये, 88.73 रुपये आणि  85.04 रुपये प्रतिलिटर इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.