पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पारोळा शहरातील शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख डाॅ. हर्षल माने शिवसेना हे नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. तसेच विविध क्षेत्रात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. त्यांनी नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेवुन कोल्हापुर,सांगली, व इतर काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे तेथे झालेल्या नुकासान ग्रस्तांना मदत व्हावी म्हणुन मुख्यमंत्री सहायत्ता निधीत पाच लाखाचा धनादेश देऊन सामाजिक बांधिलकी दाखवली.
त्यांच्या या कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी डाॅ. हर्षल माने यांच्या सोबत अपंग सेनेचे राज्य अध्यक्ष रविंद्र पाटील, माजी पारोळा तालुका शिवसेना प्रमुख दौलत पाटील आदि उपस्थित होते. त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.