डाॅ. संजीव पाटील राज्यस्तरीय नवरत्न पुरस्काराने सन्मानित

0

भडगाव ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डाॅ. संजीव पाटील यांना राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार देवुन अक्कलकोट येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर, झी २४ तास वृत निवेदक अजित चव्हाण, वटवृक्ष संस्थान अध्यक्ष महेश इंगळे, उद्योगपती हनुमंत भोसले, इंटरनँशनल मेंबर डाॅ सुधिर तारे, दादासाहेब फाळके याचे नातू चंद्रशेखर पुसाळकर, सौ.मृदुला पुसाळकर, निर्मोही फडके, शिरीषजी कुलकर्णी, सुप्रिया भारस्वाडकर उपस्थित होते. जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक तथा भाजप वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव कृष्णराव पाटील यांनी अंचळगाव व पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघात आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात चांगले योगदान दिल्या बद्दल व २००० वृक्षांचे संवर्धन केल्या बद्दल महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार १५ व्या अधिवेशनात देऊन गौरविण्यात आले. यावेळी विलासराव कोळेकर, अजित चव्हाण, चंद्रशेखर पुसाळकर, सौ. मृदुला पुसाळकर यांनी सखोल मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. यावेळी संघाच्या वेबसाईटचे उद्घाटन, तसेच शिरीषजी कुलकर्णी, सुनीलआबा पाटील यांच्यासह विविध जिल्ह्यातून आलेल्या पत्रकार पदाधिकारीनिही मार्गदर्शन केले. या प्रसंगी निर्मोही फडके, शिरीषजी कुलकर्णी, सुप्रिया भारस्वाडकर यांच्या संग्राह्य पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सोहोळ्यासाठी स्वामी समर्थ ट्रस्टचे पिंगळे साहेब, दादासाहेब फाळके, संघाचे प्रमुख संघटक प्रशांत लाड, राज्य संपर्कप्रमुख बाबासाहेब राशिनकर, अण्णासाहेब कोळी, राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ पाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुनीलआबा पाटील, तालुकाध्यक्ष अशोक परदेशी, पत्रकार संजय पवार, सुनिल कासार, सुनिल पाटील पुरुषोत्तम सोनवणे, सागर महाजन, विठ्ठल पाटील, लिलाधर पाटील, निंबा पाटील, संजय पाटील, रमेश धनगर, पी.डी.पाटील, दिलीप पाटील, व्याख्याते रविंद्र पाटील, नरेंद्र पाटील, मुख्याध्यापक कृष्णा पाटील, प्रदीप पाटील, अमोल पाटील उपस्थित पत्रकारांचे कुटुंबासह तालुक्यातील नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते .
यावेळी पुरस्कार मिळाला म्हणून येथील अक्कलकोट संस्थानच्या वतीने व जयण्येराजे भोसले संस्थांन वतीने, सोलापूर चे अभाविपचे जिल्हा संयोजक सुनील बेडगे यांनीही डॉ. पाटील यांचा सत्कार केला. डाॅ संजीव पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ना. गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे, भाजप जिल्हा अध्यक्ष उदय वाघ, खा. ए टी नाना पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री कीशोर काळकर, आ. स्मिताताई वाघ, आ. उन्मेश पाटील, जि प सभापती पोपट भोळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, भडगाव तालुकाध्यक्ष – सोमनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, जि प सदस्य, मधुकर काटे, पाचोरा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, पाचोरा तालुका सरचिटणीस प्रदीपबापू पाटील, पंचायत समिती सदस्य बन्सिलाल पाटील, युवामोर्चा जिल्हाउपाध्यक्ष गोविंद शेलार, शहराध्यक्ष नंदु सोमवंशी, आरपीआय तालुकाध्यक्ष एस डी खेडकर, भाजप शहराध्यक्ष शैलेश पाटील सह अनेक कार्यकत्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात.

Leave A Reply

Your email address will not be published.